हर्निया उपचार पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद – डॉ गिरीश बापट
हर्निया: एक आढावा
पोटाच्या आतील भागात स्नायूंचे मजबूत आवरण असते. हा भाग कमकुवत झाल्यानंतर हर्निया होतो, परिणामी स्नायूंचे आवरण फाटून छोट्या फुग्यासारखा आकार दिसतो. ज्याप्रमाणे फाटलेल्या टायरमधून आतील ट्यूब बाहेर येते त्याचप्रमाणे पोटाचे आतील आवरण पोटाच्या स्नायूंच्या कमकुवत भागातून बाहेर येते व त्याचा आकार लहान फुग्यासारखा दिसतो. हर्नियामुळे अस्वस्थता किंवा तीव्र वेदना जाणवू शकते. काही वेळा तिथे आतड्याचा भाग अडकून फास बसतो व तेथील रक्ताभिसरण बंद होऊ शकते. अशा वेळी तातडीने शस्त्रक्रिया करावी लागते.
हर्निया सामान्यत: पोटाच्या कमकुवत भागावर, किंवा नाभी आणि कंबरेच्या वरच्या भागावर छोटा फुगा किंवा सूज या स्वरूपात दिसतो. या भागात कधी कधी वेदनाही जाणवतात. हा फुगा / सूज चालताना, धावताना किंवा पोटावर ताण येईल अशा क्रिया करताना दिसतो. झोपल्यावर / आडवे झाल्यावर पूर्ण नाहीसा होतो.
बहुतेक हर्निया घातक नसतात, परंतु हर्निया असणे हे चांगले देखील नाही. हर्नियाच्या उपचारासाठी औषधे किंवा व्यायामप्रकार उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी आपल्या सर्जनचा सल्ला घेऊन शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते
हर्नियाची कारणे काय आहेत?
स्त्रिया व पुरुष या दोघांमध्येही हर्निया होऊ शकतो. हर्निया जन्मजात देखील असू शकतो किंवा काही वेळेस पोटाच्या स्नायूंचे आवरण कमकुवत झालेल्या भागांमध्ये हर्निया निर्माण होऊ शकतो. पोटाच्या आतील भागावर अधिक दाब पडून पोटाच्या स्नायूंचे आवरण कमकुवत होते आणि हर्निया होऊ शकतो. याची काही कारणे अशी –
- दीर्घकाळ खोकला
- दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाल्यामुळे जखमा.
- गर्भधारणे दरम्यान, पोटात दाब येतो.
- दीर्घकालीन बद्धकोष्ठता
- अवजड वस्तू उचलणे
- अचानक वजन वाढणे
- सतत शिंका
- वाढते वय
हर्नियाची लक्षणे :
पोटावर किंवा जांघेजवळ सूज / फुगा येणे – स्नायू कमकुवत असतील त्या ठिकाणी पोटावर किंवा जांघेजवळ सूज / फुगा दिसू लागतो. काही वेळा या जागी वेदनादेखील जाणवतात. हायाटल हर्निया ( hiatal hernia) हा पोटाच्या वरच्या बाजूला होतो. यामध्ये पित्त होणे, छातीत जळजळ होणे,उलट्या होणे अशी लक्षणे आढळतात. झोपल्यावर किंवा आडवे झाल्यावर पोटाजवळचा फुगवटा जाणवत नाही मात्र उभे राहिल्यावर किंवा पोटावर दाब दिसल्यास पुन्हा जाणवतो.
हर्निया उपचार पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद – डॉ गिरीश बापट
हर्निया सामान्यतः दुखत नाही.मात्र काही लोकांना पोटावर ताण येण्याऱ्या क्रिया केल्यानंतर वेदना जाणवू शकतात. कालपरत्वे स्नायू जसजसे आणखी कमकुवत होत जातात तसा हर्निया मोठा होत जातो. हर्निया झोपल्यावर किंवा आडवे झाल्यावर पूर्ण आत जात नसेल, लाल झाला असेल किंवा दुखत असेल तर तो अडकलेला असू शकतो. अशा वेळी तेथील भागाला फास बसण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या सर्जनशी तातडीने संपर्क साधून त्वरित उपचार घेणे आवश्यक असते.
कॅलोम्समध्ये, आम्ही हर्निया ग्रस्त व्यक्तींची सर्वतोपरी काळजी घेतो. पुण्यातील हर्नियासाठी सर्वोत्तम उपचार देणाऱ्या क्लिनिकमध्ये कॅलोम्सचे नाव आग्रहाने समोर येते. कॅलोम्स हर्निया सेंटर मधील डॉ. गिरीश बापट या तज्ञांना भेटीसाठी अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी कृपया या नंबर वर फोन करा (+91) 9765555451 / (+91) 8446441266
कॅलॉम्सची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की येथे रुग्णाचे बोर्ड-परवाना असलेल्या डॉक्टरांबरोबर पूर्ण मूल्यांकन केले जाते. कॅलोम्स हे केंद्र पुणे येथे आहे आणि राज्यातील हर्नियासाठी सुप्रसिद्ध केंद्रांपैकी एक उत्तम केंद्र आहे.
प्रत्यक्ष हर्निया
या हर्नियामध्ये पोटाच्याखालच्या भागातील स्नायू कमकुवत होतात. हा हर्निया सहसा पोटावर ताण आल्यास दिसतो. उदाहरणार्थ – अवजड वस्तू उचलणे,दीर्घ काळचा खोकला इ. सुरुवातीला जांघेजवळील भागात छोटा फुगा दिसतो. हा फुगा हाताने ढकलल्यावर आत जाऊ शकतो परंतु ताण आल्यावर पुन्हा दिसू लागतो. हा फुगा झोपल्यावर सहसा दिसत नाही.
अप्रत्यक्ष हर्निया
पोटाच्या खालच्या भागातील आतड्यांचा काही भाग किंवा चरबी जेव्हा जांघेजवळील पोकळीतून खाली सरकते तेव्हा हा हर्निया होतो. हा भाग जन्मतः कमकुवत असू शकतो. परंतु हर्निया कुठल्याही वयात दिसू शकतो. स्त्रिया व पुरुष दोघांमध्येही या प्रकारचा हर्निया होऊ शकतो.
फिमोरल हर्निया
हा हर्निया स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. जांघेजवळील भागात आतल्या बाजूस कमकुवत भाग तयार झाल्यामुळे हा हर्निया होतो.
इनसिजनल हर्निया
हर्नियाचा हा प्रकार पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेच्या व्रणामधून होतो. ऑपरेशननंतर पोट फुगणे, बरेच दिवस खोकला व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजन वाढणे या कारणांमुळे या व्रणावर ताण येतो. टाके तुटतात वा निसटतात आणि मग पोटातली आतडी वा चरबी त्वचेखाली छोट्या फुग्याच्या स्वरूपात दिसू लागतात. हळुहळू ही गाठ मोठी होते व हर्निया होतो. पूर्वीच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक महिन्यांनी वा वर्षांनीदेखील इनसिजनल हर्निया होऊ शकतो.
नाभी / बेंबीजवळील हर्निया
नावाप्रमाणेच हा हर्निया नाभी / बेंबीजवळ दिसतो. हा हर्निया लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणत्याही वयात, तसेच स्त्री व पुरुष दोघांमध्येही होऊ शकतो. नाभीभोवतीचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे हा हर्निया होतो. अतिरिक्त वजन, दीर्घकालीन खोकला व गर्भावस्था इ अनेक कारणांमुळे हा हर्निया उद्भवू शकतो.
पोटाच्या वरच्या भागातील हर्निया
हा हर्निया breastbone (छातीचे बरगड्यांना मध्यभागी जोडणारे हाड) व नाभी यांना जोडणाऱ्या रेषेत होतो. पोटात कोणत्याही कारणाने अतिरिक्त ताण निर्माण होऊन या रेषेत स्नायू कमकुवत झाले तर हा हर्निया होऊ शकतो. स्त्री व पुरुष या दोघांमध्येही हा हर्निया होऊ शकतो.
हायाटल हर्निया
छाती आणि पोटाची पोकळी यांना वेगळे ठेवणाऱ्या स्नायूंच्या पटलाला diaphragm (डायफ्रॅम) म्हणतात. या पटलातील स्नायू कमकुवत झाले तर जठराचा काही भाग छातीच्या पोकळीत ओढला जातो. या प्रकाराला हायाटल हर्निया म्हणतात.
एकदा झालेल्या ठिकाणी देखील पुन्हा हर्निया होऊ शकतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- वजन नियंत्रणात ठेवावे.
- जड वस्तू कशा उचलाव्यात किंवा त्या उचलाव्यात का नाही हे जाणून घ्यावे.
- धूम्रपान टाळावे. धूम्रपान केल्याने दीर्घकालीन खोकला होऊ शकतो.
- बद्धकोष्ठता टाळण्यासाठी तंतुमय पदार्थ खावेत या भरपूर पाणी प्यावे
- पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी व्यायाम करा.
हर्निया औषधोपचाराने बरा होत नाही. हर्नियामुळे होणाऱ्या गुंतागुंतीचा धोका टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधे देऊ शकतात. उदा. बद्धकोष्ठतेसाठी / खोकला कमी करण्यासाठी इ.
वैद्यकीय दृष्टया सर्व प्रकारच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. यामुळे पुढील गुंतागुंतीचा धोका टाळता येऊ शकतो. अर्थात यासाठी रुग्ण वैद्यकीय दृष्टया तंदुरुस्त असणे आवश्यकआहे.
झोपल्यावर / आडवे झाल्यावर पूर्ण आत जाऊ न शकणाऱ्या हर्नियासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा हर्निया तिथे अडकून आतड्याच्या त्या भागाला फास बसण्याची शक्यता असते.
हर्नियाची शस्त्रक्रिया २ प्रकारे केली जाते –
ओपन (टाक्यांची) शस्त्रक्रिया: या पारंपरिक प्रक्रियेमध्ये पोटावर मोठा छेद घेतला जातो. बाहेर येणारा भाग पुन्हा आत सारला जातो आणि पोट बंद केले जाते. कमकुवत भागाला बळकटी येण्यासाठी तिथे जाळी बसवली जाते. या शस्त्रक्रियेसाठी हर्नियाच्या जागेपुरती किंवा पूर्ण भूल दिली जाते. रुग्णाच्या पोटावर छेद असतो व तिथे अनेक टाके असतात. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये २ – ३ दिवस राहावे लागते.
लॅपरोस्कोपी / दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया: दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यात पोटावर अगदी लहान छेद घेऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घातली जातात. हर्नियाच्या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटावर ३ लहान छेद (५- १० मिमी) घेतले जातात. एकामधून कॅमेरा आत घातला जातो. हा कॅमेरा पोटाच्या आतील भाग व इतर छेदांमधून घातलेली शस्त्रक्रियेची साधने बघण्यास मदत करतो.
कमकुवत भागाच्या आतल्या बाजूने जाळी / ३ – डी जाळी बसवली जाते. या शस्त्रक्रियेसाठी सहसा पूर्ण भूल दिली जाते. हॉस्पिटल मध्ये १ – २ दिवस राहावे लागते.
दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेचे फायदे –
- लवकर बरे / पूर्ववत होणे
- लहान छेद घेतल्यामुळे अत्यल्प टाके
- अतिशय कमी वेदना
- लवकर हालचाल सुरु करता येते
- चालणे, गाडी चालवणे इ क्रियादेखील लवकर करता येतात.
- ऑफिस /कामाच्या ठिकाणी लवकर रुजू होता येते
- हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी कमी असतो.
शस्त्रक्रियेनंतर १ – २ दिवसात घरी जात येते. घरी गेल्यावर घ्यायची काळजी आणि सूचना आपल्याया सांगितल्या जातात. घरी जाताना आपल्यासोबत एखादी प्रौढ / जबाबदार व्यक्ती असावी. शस्त्रक्रियेची जागा थोडी दुखरी असू शकते. त्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात. घरी गेल्यानंतर सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे.
शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी –
शस्त्रक्रियेनंतर पहिले २४ तास आपल्याबरोबर एका प्रौढ / जबाबदार व्यक्तीने राहणे आवश्यक आहे. घरी गेल्यानंतर दुखणे असल्यास हॉस्पिटल मध्ये सूचना दिल्याप्रमाणे वेदनाशामक औषधे घ्यावीत. तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जखमेची काळजी, स्वच्छता, अंघोळ इ.सर्व सूचनांचे पालन करावे. बद्धकोष्ठ झाल्यास जोर करावा लागल्याने पोटावर ताण येतो व शस्त्रक्रियेची जागा दुखू शकते. बद्धकोष्ठ टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि आहारात तंतुमय पदार्थांचा (उदा. भाज्या,फळे व कोशिंबिरी) समावेश करावा. सौम्य औषधांचाही उपयोग होऊ शकतो.
सर्वसाधारण क्रिया –
आपली शस्त्रक्रिया पूर्ण भूल देऊन झालेली असल्यास आपला समन्वय आणि तार्किक विचारशक्ती काही काळाकरिता प्रभावित झालेली असू शकते. पूर्ण भूल दिल्यानंतर पुढील ४८ तास कोणतेही यंत्र चालवणे, मद्यपान करणे तसेच कायदेशीर कागदपत्रांवर सही करणे टाळावे.
हळूहळू आपण सर्व शारीरिक क्रिया कुठलीही वेदना न होता करू शकता. बहुतेक सर्व रुग्णांना घरातील हलकी कामे, खरेदी इ. १ – २ आठवड्यात करता येतात. तसेच ऑफिस / कामाच्या ठिकाणी १ – २ आठवड्यात रुजू होता येते. शारीरिक श्रमाचे काम असल्यास थोडी जास्त विश्रांतीची आवश्यकता असते. हलका व्यायाम (उदा: चालणे) आपल्याला पूर्ववत होण्यास मदत करतो. परंतु अतिश्रमाचा व्यायाम, अवजड वस्तू उचलणे इ. ४ – ६ आठवडे टाळणे अत्यावश्यक आहे.
सुरुवातीच्या काळात लैंगिक संबंध ठेवणे वेदनादायी असू शकते / अस्वस्थ वाटू शकते परंतु इच्छा असल्यास लैंगिक संबंध ठेवता येतात.
गाडी चालवणे –
गाडी चालवण्याआधी आपल्या सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ब्रेक दाबताना जोपर्यंत दुखणे /अस्वस्थता असेल तोपर्यंत गाडी चालवणे टाळावे (गाडी बंद असताना सराव करून पाहावे). सहसा दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर १ – २ आठवड्यात गाडी चालवता येते. Open / पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेनंतर मात्र हा कालावधी थोडा वाढू शकतो.
गाडी चालविणे सुरु करण्याआधी आपण आपल्या विमा कंपनीला सांगणे उचित आहे.
डॉक्टरांशी कधी संपर्क करावा –
आपणास खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळ्यास आपल्या सर्जनशी संपर्क करावा
- ३८ डिग्री सेल्सिअस (१००.४ डिग्री फॅ) पेक्षा जास्त ताप
- रक्तस्त्राव
- आपल्या पोटात सूज, वेदना किंवा त्यात वाढ
- वेदनाशामक औषधे घेऊन देखील दुखणे थांबत नसल्यास
- सतत मळमळ किंवा उलट्या
- अतिशय जास्त प्रमाणात थंडी वाजणे
- लघवी होण्यास त्रास होणे
- सतत खोकला किंवा श्वास घेताना दम लागणे
- जखमांभोवती लालसरपणा वाढणे
हर्निया शस्त्रक्रिया सामान्यत: सुरक्षित आहे आणि या शस्त्रक्रिये मध्ये कमी धोका आहे, परंतु इतर कोणत्याही शस्त्रक्रियेप्रमाणे काही धोक्यांची शक्यता असते –
- रक्तस्त्राव
- जंतुसंसर्ग
- दीर्घकालीन वेदना (ओपन / पोटावर छेद घेऊन केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये याची शक्यता जास्त असते)
- पोटातील इतर अवयवांना इजा (आतडे, मूत्राशय इ.)
- जखमेचा व्रण
- संपूर्ण भूल देण्याचे काही धोके – न्यूमोनिया, रक्ताच्या गुठळ्या इ.
शस्त्रक्रियेआधी रुग्ण वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त आहे याची खात्री करण्यासाठी प्रत्येक रुग्णाची सखोल तपासणी केली जाते.
हर्निया शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च बऱ्याच घटकांवर अवलंबून असते
- खोलीचा प्रकार (Private room, semi -private room, general ward)
- जाळीचा प्रकार, आकार
- Open (पोटावर छेद घेऊन) / लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
- हॉस्पिटलची निवड इ.
- रुग्णाला आधी असणारे आजार उदा. मधुमेह, हृदयविकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गंभीर देखरेख आवश्यक असेल तर हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी व पर्यायाने खर्च वाढू शकतो.
डॉक्टरांबरोबर आपली प्रथम भेट झाल्यानंतर आम्ही आपल्याला खर्चाचा साधारण अंदाज देऊ शकतो.
Bajaj Finserve च्या सहकार्याने आम्ही आपणासाठी सुलभ आर्थिक पर्याय उपलब्ध केलाआहे. आपण खर्चाची संपूर्ण रक्कम ८ सुलभ मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता.
शस्त्रक्रियेनंतर आपल्या सर्जनना १० ते १२ दिवसांनी भेटावे.