सर्वसामान्यपणे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया:
या शाखेमध्ये उदर पोकळीमधील / पचनसंस्थेमधील अवयवांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. उदा. अन्ननलिका, जठर, लहान आतडे मोठे आतडे, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय, पित्तनलिका आणि अपेंडिक्स इ. अवयवांशी संबंधित असणाऱ्या शस्त्रक्रिया. तसेच थायरॉईड ग्रंथी, हर्निया, रक्तवाहिन्या आणि अपघात झाल्यामुळे कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियादेखील या शाखेत केल्या जाऊ शकतात. त्याशिवाय एन्डोस्कोपी (Gastroscopy आणि Colonoscopy) या निदानप्रक्रियादेखील केल्या जातात.