गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

पचनसंस्थेचे आजार व त्यावरील उपचार -

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या वैद्यकशाखेत पचनसंस्था व त्यासंबंधित आजारांवर लक्ष केंद्रित केले जाते. यात तोंडापासून गुदद्वारापर्यंत सर्व अवयवांच्या आजारांसाठी उपचार केले जातात. या क्षेत्रात काम करण्याऱ्या डॉक्टरांना Gastroenterologist (पोटाच्या विकारांचे तज्ञ) असे म्हणतात.

डॉ. गिरीश बापट हे जीईआरडी (गॅस्ट्रो-ओसोफेजेल रिफ्लक्स – जठरातील पदार्थ अन्ननलिकेत उलट मार्गे फिरणे) या त्रासाच्या उपचारासाठी सर्वोत्तम डॉक्टर आहेत. ते पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी ८ वर्षांचा पूर्व-वैद्यकीय व वैद्यकीय अभ्यासक्रम आणि १ वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी ३ वर्षे निवासी डॉक्टर म्हणून काम केले आहे व त्याशिवाय २ – ३ वर्षे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी मध्ये विशेष काम केले आहे. 

या क्षेत्रातील तज्ज्ञ कोलोनोस्कोपी, एन्डोस्कोपी, endoscopic retrograde cholangiancreatography (ERCP), endoscopic ultrasound and liver biopsy (यकृतामधून तपासणीसाठी नमुने घेणे) यासारख्या अनेक निदानपद्धती व उपचारपद्धतींचा अवलंब करतात. या शाखेतील काही शिकाऊ डॉक्टर यकृत प्रत्यारोपण,अत्याधुनिक एन्डोस्कोपी, मोठ्या आतड्याचे आजार व इतर अनेक त्रास यात त्यांचे चौथे (वैद्यकीय शिक्षणातील सातवे) वर्ष पूर्ण करतील.

हिपॅटॉलॉजी / Hepatobiliary  Medicine या वैद्यकशाखेत यकृत, स्वादुपिंड व पित्ताशयाशी संबंधित आजारांचा विचार केला जातो तर Proctology या वैद्यकशाखेत गुदाशय व गुदद्वाराशी संबंधित आजारांचा विचार केला जातो. या शाखा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीच्या उपशाखा मानल्या जातात.

 

Bariatric Surgery Pune

एन्डोस्कोपी (गॅस्ट्रोस्कोपी / कोलोनोस्कोपी)

एन्डोस्कोपी या प्रक्रियेत एन्डोस्कोप हे उपकरण वापरून शरीराच्या आतील भागाची तपासणी केली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि कॅमेरा असतो. पोटातील अवयवांच्या प्रतिमा कॅमेराद्वारे व्हिडिओ मॉनिटरवर दिसतात. एन्डोस्कोप शरीरात नैसर्गिक छिद्रांमधून म्हणजे तोंड किंवा गुदद्वार यातून घातला जातो.

एन्डोस्कोपीचे प्रकार

जठराची एन्डोस्कोपी: यात अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याचा पहिला भाग तपासले जातात.

कोलोनोस्कोपीः यात संपूर्ण मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते. .

Endoscopic retrograde cholangiopancreatography (ERCP): पित्तनलिकेत खडे अडकले असतील तर ते या प्रक्रियेद्वारे काढता येतात. तसेच पित्तनलिका बंद झाली असेल तर त्यात स्टेंट टाकता येतो.

गॅस्ट्रोस्कोपी:

एन्डोस्कोपी या प्रक्रियेत एन्डोस्कोप हे उपकरण वापरून शरीराच्या आतील भागाची तपासणी केली जाते. एन्डोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि कॅमेरा असतो. यात अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याचा पहिला भाग (ड्युओडिनम) तपासले जातात.

गॅस्ट्रोस्कोपी का केली जाते?

पुढील कारणांसाठी गॅस्ट्रोस्कोपी केली जाते –

  • गिळताना त्रास होणे / सतत पोट दुखण्याचे कारण तपासण्यासाठी
  • जठरातील व्रण / जखमा (Ulcers) आणि जीईआरडी चे निदान करण्यासाठी
  • जठरातील रक्तस्त्राव / अरुंद अन्ननलिका, जठरातील कर्करोगविरहित गाठी किंवा कर्करोगाच्या अगदी लहान गाठी यांच्यावर उपचार करण्यासाठी

गॅस्ट्रोस्कोपी प्रक्रिया

या प्रक्रियेसाठी सहसा १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. परंतु उपचारांसाठी गॅस्ट्रोस्कोपी करायची असल्यास जास्त वेळ लागू शकतो. ही प्रक्रिया बाह्यरुग्ण विभागात केली जाते. यात प्रथम घशात बधीर करणारा स्प्रे मारून घसा बधीर केला जातो. नंतर रुग्णाला कुशीवर झोपवून एन्डोस्कोप रुग्णाच्या तोंडामध्ये घातला जातो व रुग्णाला गिळायला सांगितले जाते. ही नलिका लवचिक असल्याने हळूहळू अन्ननलिकेत व जठरात पुढे पुढे जाते. यामुळे श्वसनाला काहीही त्रास होत नाही. या प्रक्रियेत तपासणीसाठी नमुना काढून घेणे शक्य असते.

कोलोनोस्कोपी:

ही प्रक्रिया मोठे आतडे व गुदाशय यांच्या तपासणीसाठी केली जाते. कोलोनोस्कोपीमुळे मोठे आतडे व गुदाशय यांना आलेली सूज, व्रण किंवा काही अनैसर्गिक गाठी  यांचे निदान करता येते. तसेच यामुळे कर्करोगाची सुरुवात, शौचाच्या सवयींमध्ये  बदल, दीर्घकालीन पोटदुखी, गुदद्वारातून रक्तस्त्राव आणि वजन कमी होणे इ. त्रासांचे निदान करण्यास मदत होते. या प्रक्रियेत कोलोनोस्कोप रुग्णाच्या गुदद्वारातून आत घातला जातो. कोलोनोस्कोप ही एक लांब, पातळ आणि लवचिक नलिका असते. त्याच्या पुढील बाजूस उच्च तीव्रतेचा प्रकाश आणि कॅमेरा असतो. हळूहळू कोलोनोस्कोप पुढे सरकवून संपूर्ण मोठय़ा आतडय़ाची तपासणी करता येते. ही तपासणी करताना सहसा सौम्य स्वरूपाचे झोपेचे औषध किंवा वेदनाशामक औषध दिले जाते. रुग्णाची या औषधे घेण्याची तयारी नसल्यास ते या औषधांसाठी नकार देऊ शकतात.  

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एन्डोस्कोपी पूर्वी काय तयारी करावी?

एन्डोस्कोपी पूर्वी काय तयारी करावी?

  • तपासणीपूर्वी सहा तास काहीही खाऊ नये. पाणीदेखील पिऊ नये.
  • रक्तदाब, मधुमेह किंवा इतर काही आजार असल्यास डॉक्टरांना सांगावे.
  • कुठल्या औषधाची अॅलर्जी असल्यास डॉक्टरांना सांगावे.
  • कोलोनोस्कोपीपूर्वी पोट साफ होण्यासाठी रेचके / औषधे दिली जातात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही औषधे घ्यावीत.
गॅस्ट्रोस्कोपीचे धोके काय आहेत?

गॅस्ट्रोस्कोपी ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे, परंतु इतर कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेप्रमाणेच यातही काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रोस्कोपीनंतर पुढील गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

  • अंतर्गत रक्तस्त्राव
  • अन्ननलिका,जठर किंवा लहान आतड्याच्या पहिल्या भागाला (ड्युओडिनम) भोक पडणे.
कोलोनोस्कोपीसाठी काय पूर्वतयारी करावी?

आपले मोठे आतडे आतून व्यवस्थित दिसण्यासाठी ते पूर्ण रिकामे असणे आवश्यक आहे. यासाठी तपासणीच्या आधी काही दिवस डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आहार घ्यावा. तसेच पोट साफ होण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रेचके / औषधे घ्यावीत. 

कोलोनोस्कोपीचे धोके काय आहेत?

कोलोनोस्कोपीमध्ये पुढीलपैकी काही गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

  • आतड्याला भोक पडणे
  • रक्तस्त्राव
  • अपूर्ण चाचणी (१०% रुग्णांमध्ये काही कारणांमुळे तपासणी पूर्ण होऊ शकत नाही)