बॅरिऍट्रिक /लठ्ठपणा

बॅरिऍट्रिक /लठ्ठपणा निवारण शस्त्रक्रिया

पुणे येथे लठ्ठपणा निवारण उपचार 

लठ्ठपणा म्हणजे काय?

लठ्ठपणा म्हणजे फक्त अतिरिक्त खाण्यामुळे वाढलेले वजन इतके साधे आणि सोपे नाही. तर लठ्पणाला आता एक गंभीर आजार मानले जाते. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत वाढलेले वजन हे समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जात असे. जगातील काही भागात अजूनही अशी समजूत आहे.

२०१३ मध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशनने लठ्ठपणाला एक रोग म्हणून वर्गीकृत केले आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, वंध्यत्व, पीसीओएस (पीसीओडी), संधिवात, झोपेत श्वास बंद होणे, इत्यादि इतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. 

लठ्ठपणा हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रौढ आणि मुलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. लठ्ठपणाकडे २१ व्या शतकातील सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून पहिले जाते.

लठ्ठपणाची कारणे:

आपण वजन का वाढते आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर ते कसे वजन कमी होईल याचे सोपे स्पष्टीकरण आता आपण पाहूया. आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते आणि आपण जे अन्न खातो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. योग्य वजन असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या दैनदिन गरजे इतक्याच ऊर्जेचे सेवन करतात. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर खाल्लेल्या सर्व अन्नाचा / ऊर्जेचा ते योग्य प्रकारे विनिमय करतात आणि वजन नियंत्रणात ठेवतात. वैयक्तिक पातळीवर सांगायचे झाल्यास, जीवनशैलीत होत असलेले बदल, अतिरिक्त खाणे आणि शारीरिक श्रमांचा अभाव हे बहुतांश लठ्ठ लोकांमध्ये दिसून येते. काही वेळा लठ्ठपणाचे कारण आनुवांशिक, वैद्यकीय किंवा मानसिक आजार हे असू शकते. त्याउलट, सामाजिक पातळीवर सांगायचे झाल्यास लठ्ठपणाचे वाढते प्रमाण हे आहारातल बदल, दुचाकी / चारचाकी गाड्यांचा वाढता वापर आणि यांत्रिकीकरण आहे असे दिसून येते.

लठ्ठपणाचे परिणाम किंवा लठ्ठपणावर उपचार घेणे का आवश्यक आहे?

लठ्ठपणा आणि त्याच्या संबंधित आरोग्यविषयक समस्या यांच्या उपचारांचा खर्च प्रचंड आहे. खर्चाचा विचार केला नाही तरी लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणार परिणाम हा खरोखर काळजीचा विषय आहे. लठ्ठपणामुळे शरीरातील जवळजवळ सर्व अवयवांवर परिणाम होतो. लठ्ठपणामुळे माणसाचे आयुष्यमान १० वर्षांपर्यंत कमी होऊ शकते. वजन जितके जास्त आणि जितका काळ जास्त तितक्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 
अतिरिक्त वजन असल्यामुळे खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात –

 • आयुष्यमान कमी होणे 

 • मधुमेह (प्रकार २) 

 • उच्च रक्तदाब

 • वाढलेले कोलेस्टरॉल

 • संधिवात 

 • झोपेत श्वास बंद पडणे 

 • हृदयविकार 

 • पित्ताशयाच्या समस्या 

 • काही प्रकारचे कर्करोग (स्तन, गर्भाशय, आतडे)

 • पचनसंस्थेच्या समस्या (उदा. जीईआरडी)

 • श्वासोच्छवासाच्या समस्या (उदा. दमा)

 • मानसिक समस्या (नैराश्य)

 • वंध्यत्व / गर्भधारणेच्या समस्या – पीसीओडी 

लघवीवर नियंत्रण नसणे

लठ्ठपणासाठी उपचार, पुणे 

लठ्ठपणा निवारण किंवा बॅरिऍट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे काय?

बॅरिऍट्रिक / लठ्ठपणा निवारण शस्त्रक्रिया ही वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणून ओळखली जाते. बॅरिऍट्रिक हा शब्द ग्रीक भाषेतून आला असून याचा अर्थ वजन किंवा दाब असा आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्या व्यक्तीचे खाणे कमी होते (उदा: गॅस्ट्रिक बँड, स्लीव्ह गॅस्ट्रोक्टॉमी) किंवा खाणे कमी होते व खाल्लेले अन्न शरीरात पूर्ण शोषले जात नाही (गॅस्ट्रिक बायपास, मिनी गॅस्ट्रिक बायपास किंवा ड्युओडिनल स्विच). या शस्त्रक्रियेत शरीरातील चरबी काढून टाकणे (उदा: लायपोसक्शन किंवा ऍबडॉमिनोप्लास्टी – टमी टक) ही प्रक्रिया केली जात नाही.

lap band surgery in Pune
Bariatric Surgery Pune
bariatric surgery cost in Aurangabad

बॅरिऍट्रिक सर्जरी का करावी?

या शस्त्रक्रियेनंतर वजन कमी होण्याबरोबरच आरोग्यावर अनेक चांगले परिणाम होतात. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर आरोग्यविषयक समस्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसते. संदर्भासाठी आपण खालील सारणी पाहू शकता.  

स्वीडनमध्ये आयोजित केलेल्या एका अभ्यासात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांच्या आणि न केलेल्या रुग्णांच्या आरोग्यात स्पष्टपणे फरक दिसून आला.

 बॅरिऍट्रिक शस्त्रक्रियेचे प्रकार

कॅलोम्स येथे लठ्ठपणा निवारणासाठी गॅस्ट्रिक बॅंडिंग, गॅस्ट्रिक बायपास, स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी आणि गॅस्ट्रिक बॅलून यासारख्या सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात. या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केल्या जातात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर आपल्याला हालचाल करणे आणि पूर्ववत होणे लवकर शक्य होते. आमच्या सेवेमध्ये महत्त्वाचे म्हणजे कॅलोम्स येथे आम्ही सर्वजण एक संघ म्हणून काम करतो. प्रत्येक सदस्य स्वतःची भूमिका समजून काम करतो. आपणास वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती आहे याची आम्ही खात्री करतो. ही शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित वातावरणात केली जाते. आपली सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचीआहे.

ही शस्त्रक्रिया कशी कार्य करते?

लठ्ठपणा निवारण शस्त्रक्रियेमुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे जाणारे उष्मांक नियंत्रित केले जातात. हे करण्यासाठी दोन पद्धतींचा अवलंब करता येतो – 

 • प्रतिबंध –यात जठराचा आकार कमी केला जातो. त्यामुळे आहार कमी होतो आणि भूक लवकर शमते.

 • प्रतिबंध व कुपोषण / अल्पशोषण – यात जठराचा आकार कमी केला जातो. त्याबरोबरच लहान आतड्याचा मार्गही बदलला जातो (Roux – en – Y Bypass). यामुळे आहार कमी होण्याबरोबरच शरीरात उष्मांक शोषले जाण्याचे प्रमाणही कमी होते.

Bariatric Surgery Pune

लॅपरोस्कोपिक गॅस्ट्रिक बँडिंग म्हणजे काय?

जठराच्या वरच्या बाजूला फुगवता येण्यासारखा एक सिलिकॉन बँड लावला जातो. ही प्रक्रिया कीहोल (लॅपरोस्कोपिक – दुर्बिणीद्वारे) तंत्रज्ञान वापरून केली जाते त्यामुळे पोटावर अगदी लहान व्रण दिसतात. गॅस्ट्रिक बँडमुळे आहार मर्यादित होतो. गॅस्ट्रिक बँडला एक पोर्ट जोडलेले असते. हे पोर्ट त्वचेखाली ठेवले जाते. शस्त्रक्रियेनंतर गॅस्ट्रिक बँड फुगविणे किंवा त्याचा दाब कमी करणे यासाठी सुईद्वारे पोर्टमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

फायदे:

 • अतिरिक्त वजनाच्या सुमारे ५० – ६० % पर्यंत वजन कमी होऊ शकते. 

 • आहार मर्यादित होतो.

 • बँड काढता येऊ शकतो. परंतु तो तसाच ठेवावा हे उद्दिष्ट असते. बँड काढल्यानंतर अनेकदा वजन पुन्हा वाढलेले दिसते.

Mini Gastric Bypass Surgery in Pune

स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी:

या शस्त्रक्रियेमध्ये जठराचा नळीसारखा आकार तयार केला जातो व उरलेले जठर काढून टाकण्यात येते. यामुळे तयार झालेल्या नवीन जठराची क्षमता नैसर्गिक क्षमतेपेक्षा बरीच कमी असते. काही वेळा अतिलठ्ठ रुग्णांमध्ये वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांची पहिली पायरी म्हणून स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी केली जाते. वजन काही प्रमाणात कमी झाल्यानंतर पुढची शस्त्रक्रिया करता येते व ती अधिक सुरक्षित होते. बऱ्याच रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी ही एकच शस्त्रक्रिया पुरेशी ठरते. परंतु या शस्त्रक्रियेनंतर वजन कमी झाल्याबद्दलची दीर्घकालीन माहिती अजून उपलब्द्ध नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

 फायदे:

 • अतिरिक्त वजनाच्या सुमारे ५० – ६० % पर्यंत वजन कमी होऊ शकते. 

 • आहार मर्यादित होतो. 

 • पचनसंस्थेमधून अन्न नेहमीच्याच मार्गाने पुढे जाते. त्यामुळे आहारातील घटक पदार्थांचे शोषण व्यवस्थित होते. 

या शस्त्रक्रियेत लहान आतड्याचा मार्ग बदलला जात नाही.  

Bariatric Treatment in Pune

गॅस्ट्रिक बायपास (LRYGB):

या शस्त्रक्रियेत जठराचा सुमारे ३० – ६० मिली क्षमतेचा छोटा पिशवीसारखा आकार तयार केला जातो. यानंतर लहान आतड्याचे एका विशिष्ट ठिकाणी विभाजन केले जाते. या विभाजित आतड्याचा खालील भाग वर आणून जठराच्या नवीन तयार केलेल्या पिशवीशी जोडला जातो. अशाप्रकारे, अन्न या पिशवीतून सरळ आतड्याच्या खालच्या भागात जाते. उर्वरित जठर आणि वगळलेला लहान आतड्याचा भाग नंतर पुन्हा आणखी खाली जोडले जातात. यामुळे जठर आणि स्वादुपिंडातील पाचक रस लहान आतड्यात प्रवेश करून अन्नाचे पचन करू शकतात. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने जीवनसत्वयुक्त औषधे (Multivitamins), कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी, तसेच दर तीन महिन्यांनी व्हिटॅमिन बी १२ इंजेक्शन घेणे फायद्याचे ठरते. 

फायदे:

 • वजन कमी होण्याची क्रिया शस्त्रक्रियेच्या वेळेपासूनच सुरू होते आणि वजन कमी होण्याचा वेग पहिल्या ६ महिन्यांमध्ये अतिशय जलद असतो. 

 • २ वर्षांमध्ये अतिरिक्त वजनाच्या सुमारे ७० – ८० % पर्यंत वजन कमी होऊ शकते. 

 • बहुतेक रुग्णांमध्ये ही एकच शस्त्रक्रिया पुरेशी ठरते व पुढील शस्त्रक्रिया आवश्यक नसते.

 • शरीरामधील संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे भूक कमी होते. 

मधुमेहावर उतार पडणे जलद सुरु होते.

Obesity Clinic in Pune

मिनी गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया अमेरिकेतील डॉ रॉबर्ट रूटलेज यांनी १९९७ मध्ये प्रथम विकसित केली. या शस्त्रक्रियेत प्रथम जठराच्या उजव्या बाजूने एका नळीसारखा आकार तयार केला जातो. आतड्याच्या सुरुवातीपासून सुमारे १८० सें.मी. अंतरावर लहान आतड्याचा एक भाग वर उचलून जठराच्या नवीन तयार केलेल्या नळीला जोडला जातो. मिनी गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया गॅस्ट्रिक बायपास या शस्त्रक्रियेचा तुलनेत अधिक साधी व सोपी आहे. तसेच यात गुंतागुंत होण्याची शक्यताही कमी आहे आणि या शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळपर्यंत वजन कमी राहिलेले दिसते. त्यामुळे गॅस्ट्रिक बायपास या शस्त्रक्रियेला पर्याय म्हणून मिनी गॅस्ट्रिक बायपास ही शस्त्रक्रिया अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आशियातील वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियांपैकी सुमारे १५.४ % शस्त्रक्रिया मिनी गॅस्ट्रिक बायपास या तंत्रज्ञानाद्वारे केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. 

 ही शस्त्रक्रिया खालील प्रकारे काम करते – 

 • प्रतिबंध यात जठराचा छोट्या पिशवीसारखा आकार तयार केल्यामुळे आहार कमी होतो. 

 • कुपोषण / अल्पशोषण – यात लहान आतड्याचा काही भाग वगळला जातो. लहान आतड्यात खाल्लेल्या अन्नातील उष्मांक शोषले जाण्याची क्रिया घडते. परंतु या शस्त्रक्रियेत अन्न लहान आतड्याच्या काही भागाच्या संपर्कात न येता एकदम पुढच्या भागात प्रवेश करते. त्यामुळे शरीरात उष्मांक शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते व वजन कमी होण्यास मदत होते.

 • संप्रेरकांतील बदल- जठरात घ्रेलिन नावाचे एक संप्रेरक असते. भूक लागण्याच्या प्रक्रियेशी निगडित असल्यामुळे घ्रेलिनला संशोधकांनी ‘हंगर हॉर्मोन’ असे टोपणनाव दिले आहे. या शस्त्रक्रियेनंतर घ्रेलिनच्या पातळीत लक्षणीयरीत्या घट होते व भूक कमी होते.  

Acid Reflux Treatment Pune

गॅस्ट्रिक बलून म्हणजे काय?

गॅस्ट्रिक बलून ही पोटावर छेद न घेता केली जाणारी प्रक्रिया आहे. यामुळे शस्त्रक्रियेशिवाय वजन कमी केले जाऊ शकते. या प्रक्रियेत गॅस्ट्रोस्कोप किंवा एंडोस्कोपच्या साहाय्याने जठरात मऊ, सिलिकॉनचा बलून/ फुगा सोडला जातो. जठरात गेल्यानंतर त्यात निर्जंतुक केलेले रंगीत पाणी भरले जाते. या फुग्यामुळे जठराचा मोठा भाग व्यापला जातो व रुग्णाला पोट भरलेले असल्याची भावना होते. गॅस्ट्रिक बलून ही पुन्हा उलट / पहिल्यासारखे होण्याची प्रक्रिया आहे म्हणजे आपल्या जठरात किंवा आतड्यात (स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी किंवा गॅस्ट्रिक बायपाससारखे) कोणतेही कायमस्वरुपी बदल केले जात नाहीत. या प्रक्रियेमुळे भूक कमी होते, आहार मर्यादित होतो तसेच खाण्याच्या सवयीत बदल होतात. या प्रक्रियेनंतर १० ते ३० किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते. ही प्रक्रिया आता डॉ गिरीश बापट यांनी भारतात पुणे येथे उपलब्ध केली आहे.

गॅस्ट्रिक बलून कसा काम करतो?

जठरात बलून सोडून तो निर्जंतुक रंगीत पाण्याने भरला जातो. जठराचा बराचसा भाग बलूनने व्यापला जातो त्यामुळे रुग्णाला भूक कमी लागते. आहार मर्यादित होऊन देखील आधीप्रमाणेच पोट भरल्याचे समाधान मिळते.

 गॅस्ट्रिक बलून जठरात कसा सोडला जातो?

ही प्रक्रिया तेवढ्या जागेपुरती भूल देऊन आणि झोपेचे औषध देऊन केली जाते. डॉ. गिरीश बापट गॅस्ट्रोस्कोप/ एंडोस्कोपद्वारे बलून जठरात सोडतात. या प्रक्रियेला सुमारे ३० मिनिटे लागतात. ही एका दिवसात होणारी प्रक्रिया आहे. यासाठी सहसा हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता नसते.

 गॅस्ट्रिक बलून किती काळापर्यंत जठरात राहू शकतो?

गॅस्ट्रिक बलून जास्तीत जास्त ६ महिने जठरात ठेवता येतो. आवश्यकता असल्यास ६ महिन्यांनी आधीचा बलून काढून दुसरा सोडता येतो.

 गॅस्ट्रिक बलूनमुळे किती वजन कमी होते?

सर्वोत्तम परिणामांसाठी गॅस्ट्रिक बलूनसोबत जीवनशैलीत बदल करणे फायद्याचे ठरते. उदा: पोषक आहार(यासाठी आमच्या आहारतज्ञ आपल्याला मदत करतील) आणि नियमित व्यायाम. गॅस्ट्रिक बलूननंतर १० – ३० किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते.

 गॅस्ट्रिक बलूनमुळे शरीरावर इतर काय परिणाम होऊ शकतात?

गॅस्ट्रिक बलूनमुळे सुरुवातीच्या काळात मळमळ किंवा उलटीची भावना होऊ शकते. परंतु या तक्रारी कालांतराने बऱ्या होतात.

 गॅस्ट्रिक बलून कधी आणि कसा काढतात?

गॅस्ट्रिक बलून एंडोस्कोपीद्वारे काढतात. ही सुद्धा एका दिवसात होणारी प्रक्रिया आहे. यासाठी सहसा हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता नसते.

 गॅस्ट्रिक बलूनसाठी किती खर्च येतो?

गॅस्ट्रिक बलूनचा खर्च आपल्याला आधी असणाऱ्या तक्रारी (मधुमेह, उच्च्च रक्तदाब इ.) आणि बलूनचा प्रकार अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. 

अधिक माहितीसाठी +९१९७६५५५५४५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

माझ्यासाठी कोणती शस्त्रक्रिया योग्य आहे?

या प्रश्नासाठी कोणतेही एक असे ठोस उत्तर नाही. आपल्याला आपल्या माहितीप्रमाणे एखादी शस्त्रक्रिया आपल्यासाठी योग्य आहे असे वाटू शकते. प्रत्येकाची वैयक्तिक गरज तसेच आधी असण्याऱ्या शारीरिक तक्रारी (उदा: मधुमेह,उच्च रक्तदाब इ.) लक्षात घेऊन आमची अनुभवी टीम हा निर्णय घेते.

मी शस्त्रक्रियेसाठी योग्य आहे का?

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेच्या पात्रतेसाठी काही सर्वमान्य निकष आहेत – 

 • आपले लिंग आणि उंची यानुसार जे योग्य वजन आहे त्यापेक्षा ४५ किलो जास्त वजन 

 • बीएमआय (BMI) ३८.५ पेक्षा जास्त – आशियाई लोकांसाठी किंवा बीएमआय (BMI) ३३.५ पेक्षा जास्त आणि त्याबरोबर असणाऱ्या शारीरिक तक्रारी उदा: मधुमेह, उच्च रक्तदाब, झोपेत श्वास बंद पडणे 

 • वजनामुळे असणाऱ्या इतर शारीरिक तक्रारी 

 • मानसिक आजार नसणे/ औषधांवर अवलंबून राहावे लागणारा इतर कोणताही आजार नसणे  

रुग्ण शस्त्रक्रियेतील संभाव्य धोके समजून घेण्यास सक्षम असावा

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो 

 • खोलीचा प्रकार (Private room, semi -private room, general ward)

 • शस्त्रक्रियेचा प्रकार 

 • Open (पोटावर छेद घेऊन) / लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया

 • हॉस्पिटलची निवड इ.

 • रुग्णाला आधी असणारे आजार उदा. मधुमेह, हृदयविकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीत गंभीर देखरेख आवश्यक असेल तर हॉस्पिटल मध्ये राहण्याचा कालावधी व पर्यायाने खर्च वाढू शकतो. 

डॉक्टरांबरोबर आपली प्रथम भेट झाल्यानंतर आम्ही आपल्याला खर्चाचा साधारण अंदाज देऊ शकतो.

Bajaj Finserve च्या सहकार्याने आम्ही आपणासाठी सुलभ आर्थिक पर्याय उपलब्ध केलाआहे. आपण खर्चाची संपूर्ण रक्कम ८ सुलभ मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता.  

पुनर्तपासणी

शस्त्रक्रियेनंतर आपल्या सर्जनना १० ते १२ दिवसांनी भेटावे.

Related Videos

Lap Band Surgery – Laparoscopic Gastric Banding

Sleeve Gastrectomy

Mini Gastric Bypass Animation

Gastric Bypass Animation

Laparoscopic Gastric Bypass Operation

Laparoscopic Sleeve Gastrectomy CG

Laparoscopic Gastric Bypass Operation